Nashik Gold Market | सोनं लाखांच्या घरात, दर वाढले तरीही नाशिकमध्ये ग्राहकांमध्ये उत्साह कायम
नाशिकमध्ये सोने प्रति तोळा लाखाच्या उंबरठ्यावर, 99 हजार 900 रुपये नाशकात सोन्याचा भाव...
सोन्याचा भाव वाढत असला तरी ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह कायम...
सोन्याच्या भावाने मोठी उसळी मारली असून सोने खरेदीदारांमध्ये देखील उत्साह कायम पाहायला मिळतोय. सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कायम असून येत्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याचा देखील सोने विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
सोन लाखांच्या पार गेले असले तरी मात्र सण उत्सवाच्या काळात आणि पारिवारिक जीवनात सोने खरेदीसाठी कोणताही मुहूर्त न बघता ग्राहक सोने खरेदी करत असतात. मात्र वयाच्या 75 व्या वर्षी बायकोला वाढदिवसानिमित्त सोना खरेदी करण्यासाठी देखील ग्राहक तितक्याच आनंदाने वाढलेल्या सोन्याच्या भावात सोने खरेदी करत आहेत.